इस्राएलचा सर्वात ज्ञानी राजा म्हणून ओळखला जाणारा राजा शलमोन ह्याची तीन पुस्तके पवित्र शास्त्रात आहेत: नीतिसूत्रे, उपदेशक आणि गीतरत्ने. मानव ख-या अर्थाने शहाणपण कसे मिळवू शकतो आणि देवाचा सन्मान कसा करू शकतो, यावर एक अनोखा दृष्टीकोन प्रत्येक पुस्तकात प्रस्तुत केला गेला आहे. प्रत्येक पुस्तकाचा संदेश आणि तो एकूणच पवित्र शास्त्रसंबंधी कथेत कसा बसतो याचा थोडक्यात शोध या व्हिडिओमध्ये आम्ही घेणार आहोत.